मी दिपक परदेशी (सहा. शिक्षक) एकच ध्यास गुणवत्ता विकास ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, ८८८८८३५१८५

मार्गदर्शक

मार्गदर्शक:> 1) मा.डॉ.कारेकर साहेब - उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे, 2) मा.श्री.दिलीपभाऊ बराटे - खजिनदार - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 3)मा.श्री.संग्रामदादा मोहोळ - विश्वस्त- नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 4)मा.श्री.कुणालदादा मोहोळ - विश्वस्त - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 5) मा.श्री.खाडे व्ही. डी.- प्राचार्य बंडोजी खंडोजी माध्य. व उच्च. माध्यमिक विद्यालय धायरी पुणे.

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कै.मामासाहेब मोहोळ

५ फेब्रुवारी कै.मामासाहेब मोहोळ जन्मदिन ........
पुणे जिल्ह्याचे भाग्यविधाते कै.मामासाहेब मोहोळ
सामाजिक ,राजकीय ,सहकार ,क्रीडा ,शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य काम करणारे ,पुणे जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे मामासाहेब उर्फ नामदेवराव मोहोळ यांचा आज जन्मदिन त्या निमित्त त्यांच्या कार्याचा अल्पसा परिचय .....
          फेब्रुवारी १९०५ रोजी मुठा (मुळशी ) या दुर्गम खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले शिक्षणापासून वंचित राहिलेले मामासाहेब उर्फ नामदेवराव सदाशिवराव मोहोळ यांनी शिक्षणाच्या माहेरघरात मोलाचे कार्य केले आहे.पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे जिल्हा बँक,कात्रज दुध संघ या नावाने प्रसिद्धीस असलेला पुणे जिल्हा सहकारी दुध संघ या संस्था ज्या पुण्याच्या मानबिंदू म्हणून संबोधल्या जातात.त्यांच्या स्थापनेत मामासाहेब मोहोळ यांची तीव्र इच्छाशक्ती कार्य महत्वाचे आहे.शेतकरी कुटुंबातील मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये हि त्यांची तळमळ.
          महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेला विश्वास तेवढ्याच प्रामाणिकपणे सिद्ध करत मामासाहेबांनी देखील पुणे जिल्हयाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविले होते.जिल्ह्याच्या राजकारणात निरंकुश सत्ता असलेल्या मामासाहेबांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर मंत्रिपदाचे बोलावणे आले होते.मात्र,समाजकार्यात लोकांशी घट्ट झालेली नाळ ढिली होऊ नये याकरिता त्यांनी आलेले मंत्रिपद नाकारले.
          कुस्ती म्हणजे मामासाहेबांचा जीव कि प्राण. पै.मारुती माने,पै.हरिश्चंद्र बिरासदार, पै.आंदळकर यांनीदेखील मामासाहेबांमुळे मोठे झाल्याचे नम्रपणे काबुल केले.भारताला कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर घेण्याकरिता अखिल भारतीय कुस्ती महासंघाची स्थापना केली.मामांसह आण्णासाहेब मगर , साहेबराव सातकर ,विठ्ठलराव सातव ,शंकरराव उरसळ,अनंतराव पाटील ,शंकरराव पाटील,हे सर्व नेतेच नव्हे तर पुणे जिल्हाच्या राजकारणातील कोणताही निर्णय घेताना स्वतः यशवंतराव चव्हाण मामासाहेबांचा शब्द प्रमाण मानत होते.
          आज 'डोंगरी विकास योजना' राज्य पातळीवर मोठ्या दिमाखात सुरु आहे.या योजनेचे आद्य प्रवर्तक संस्थापक मामासाहेब आहेत.त्याकाळी त्यांनी ११ मे १९६४ रोजी 'डोंगर विभाग विकास परिषद' भरविली खऱ्या अर्थाने मावळाच्या विकासाचे प्रयत्न शासन दरबारी केले.मामासाहेबांचा वारसा त्यांचे तीनही चिरंजीव भाऊसाहेब,आप्पासाहेब, मा.खासदार अण्णासाहेब जोपासत आहेत.
          नामदेवराव मोहोळ विद्या क्रीडा प्रतिष्ठाण तसेच मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ या संस्था स्थापन करून चांगल्या प्रकारे चालविल्या आहेत.आज या संस्थेची पुणे,नगर,नाशिक,बीड,या जिल्ह्यात जवळपास २८ माध्यमिक विद्यालये,औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,अपंग कल्याण केंद्र ,पिरंगुट (ता.मुळशी )येथे व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय (एम.बी..)कार्यरत आहे.
          मामासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

                                             श्री.विलास शंकर बनसुडे

                         उपशिक्षक :स्व.तू.गो.गोसावी विद्यालय,विठ्ठलवाडी,पुणे