राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दि. १९/१०/२०१६पासून उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची अंतिम मुदत ३१/१२/२०१६ ही आहे.
गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी करिता खाली बटन वर click करा